
राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी जात, धर्म, पक्षभेद गट – तट बाजूला ठेवून ग्रामीण भागाचा चौफेर कायापालट करून दाखवला आहे. त्यांच्या सर्वसमावेशक नेतृत्वास प्रभावित होत काँग्रेस पक्षाचे लोकप्रतिनिधी शिवसेनेत दाखल होत आहेत. या गळतीमुळे ग्रामीण भागात काँग्रेस रसातळाला चालल्याचं चित्र आहे. सिरसवाडी व साळेगाव येथील काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींनी शिवसेनेत प्रवेश केला.
दररोज काँग्रेसचे राज्यपातळीवरील नेते पक्ष सोडून जात आहेत. अर्जुन खोतकर यांच्या झंझावाती जनसंवाद दौऱ्यात गुरूवारी साळेगाव हडप येथील काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्य रंगनाथ म्हस्के, मधुकर म्हस्के, प्रकाश गंगातिवरे, बाबासाहेब म्हस्के, माणिक म्हस्के, राहुल गंगातिवरे, वैजिनाथ गंगातिवरे, रावसाहेब म्हस्के, भास्कर म्हस्के, यांनी प्रवेश केला. साळेगाव हडप येथे ग्रामपंचायत भवन, पाणी पुरवठा योजना, दलित वस्तीअंतर्गत रस्ता व नाला अशी पंचेचाळीस लाखांची कामे पूर्णत्वास असून सोळा लाखांची कामे मंजूर केली असे त्यांनी नमूद केले. या वेळी सरपंच विनायक गुळमकर, प्रभाकर घारे, पुरूषोत्तम घारे, संदीप घारे, द्यानेश्वर घारे, सुरेश घारे यांची उपस्थिती होती.
सिरसवाडीत काँग्रेसचे ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब ढगे, गजानन ढगे, कृष्णा ढगे, भरत ढगे, सुरेश पवार, कृष्णा ठोंबरे, काका कवचट, राजू ढगे, राहुल ढगे, लक्ष्मण ढगे, कैलास ठोंबरे, जालिंदर ठोंबरे, दिनेश ठोंबरे दीपक वाहुळकर, राजू सोनवणे, सदानंद हिवाळे, शिवाजी पडूळ, केदार वाघमारे, गणेश वाघमारे, जिजाऊ कुमफळे, शेख जलील शेख जिलानी, यांनी काँग्रेस पक्षास सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना शिवसेनेत योग्य सन्मान दिला जाईल असे असे खोतकर यांनी सांगमहिला, तरूण व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


























































