भाजप महिला उमेदवारास ‘आयटम’ म्हणाले कमलनाथ, निवडणूक आयोगात तक्रार दाखल

बिहार विधानसभा निवडणुकीबरोबरच उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसह अनेक राज्यात पोटनिवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. मध्य प्रदेशमध्ये होत असलेल्या पोटनिवडणुकीकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. अशातच काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि मध्ये प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी भाजपच्या महिला उमेदवार इमरती देवी यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह्य टीका केली आहे. आता यावरूनच मध्ये प्रदेशमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. कमलनाथ यांच्या या वक्तव्यावर भाजप आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

मध्ये प्रदेश येथील डबरा येथून काँग्रेसचे उमेदवार असलेले सुरेंद्र राजेश यांच्या प्रचारादरम्यान कमलनाथ म्हणाले की, ‘सुरेंद्र राजेश आमचे उमेदवार असून ते साध्या सरळ स्वभावाचे आहेत. ती यांच्या सारखी नाही, काय नाव आहे तीच? मी काय तीच नाव घेऊ, तुम्ही तर माझ्यापेक्षाही तिला चांगल्याप्रकारे ओळखता. तुम्ही तर मला आधीच सावध करायला हवं होतं. ही काय आयटम आहे.’, असं ते म्हणाले आहेत.

दरम्यान, भाजपने कमलनाथ यांच्या या वादग्रस्त वक्तव्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार दाखल केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या