सभागृह चालवण्याचा आमचा मानस होता, पण… ; काँग्रेस नेत्यांनी दिलं स्पष्टीकरण

adhir ranjan chaudhari

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे आज सूप वाजले. यानंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्षांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला. ‘बहुमताच्या बळावर केंद्र सरकारने विरोधी पक्षांना दडपले’, असा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.

‘सभागृह चालवण्याचा आमचा मानस होता, पण टेनी साहेबांचा मुद्दा पुढे आल्यावर आम्ही सरकारला सवाल केला. अजय मिश्रा टेनी यांना नैतिकतेच्या आधारावर बडतर्फ करायला हवे होते. सभागृहात बहुमताच्या जोरावर सरकारने विरोधकांना दडपून सभागृह ठप्प करण्यासाठी तणाव निर्माण केला’, असा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला आहे.