राहुल गांधींचा Covid-19, नोटबंदी आणि जीएसटी वरून निशाणा

1801

हार्वर्ड बिझिनेस स्कूलमधील अपयशाच्या अभ्यासक्रमामध्ये अभ्यास करण्यासाठी हिंदुस्थानच्या केंद्र सरकारने कोरोना विषाणूविषयी उचललेल्या पावलांचाही समावेश होईल, असे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांच्या संख्येवरून राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. त्यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींच्या भाषणाची क्लिपही शेअर केली आहे.

ज्यामध्ये पीएम मोदी असे म्हणत आहेत की महाभारताचे युद्ध 18 दिवस चालले होते आणि कोरोनाबरोबरचे युद्ध 21 दिवस चालेल. कोविड -19 रुग्णांची संख्या हिंदुस्थानात कशी वाढली आहे आणि जगात तिसर्‍या क्रमांकावर कसा पोहोचला आहे हे दर्शविणाऱ्या या व्हिडिओ क्लिपमध्ये एक आलेख देखील जोडण्यात आला आहे.

या व्हिडिओसह राहुल यांनी ट्विटरवर लिहिले आहे की, ‘भविष्यात हार्वर्ड बिझिनेस स्कूल (एचबीएस) अपयशाचा अभ्यास करेल तेव्हा कोविड -19, नोटाबंदी आणि जीएसटी यावर अभ्यास करेल’. राहुल गांधींची ही प्रतिक्रिया रशियापेक्षा हिंदुस्थानात कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढल्यानंतर आली आहे. आता संपूर्ण जगात अमेरिका आणि ब्राझील हिंदुस्थानपेक्षा पुढे आहेत.

गेल्या 24 तासांत कोविड -19 च्या 24,248 नवीन रुग्णांची नोंद झाली आणि या विषाणूमुळे 425 लोक मरण पावले. यासह, देशात संक्रमित लोक आणि मृत्यूची एकूण संख्या अनुक्रमे 6,97,413 आणि 19,693 वर गेली. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, “सध्या रूग्णांच्या बरे होण्याचा दर 60.85 टक्के आहे.”

आपली प्रतिक्रिया द्या