शेअर बाजारातील घोटाळय़ाची चौकशी करा

लोकसभा निकालाच्या काही दिवस आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी खोटा एक्झिट पोल प्लांट केला. निकालाच्या दिवशी शेअर बाजार उसळेल, असा दावा त्यांनी केला. मात्र त्या दिवशी शेअर बाजार जोरदार आपटला. त्यामुळे 5 कोटी गुंतवणूकदारांचे सुमारे 30 लाख कोटी बुडाले. या सर्व घोटाळय़ाची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होता. त्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष अखिलेश यादव, सुफीया यांच्या नेतृत्वाखाली मुंबई शेअर बाजाराबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली. या वेळी निदर्शने करणाऱया कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.