पुलवामा हल्ल्याच्या चौकशीचे काय झाले? राहुल गांधींकडून केंद्र सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

आज पुलवामा हल्ल्याला एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षी झालेल्या या हल्ल्यात 44 जवान शहीद झाले होते. या निमित्ताने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शहीद जवानांना श्रध्दांजली वाहिली. तसेच या प्रकरणी केंद्र सरकारवर त्यांनी प्रश्नांचा भडीमार केला आहे. या हल्ल्याच्या चौकशीचे काय झाले असा सवाल राहुल गांधींनी विचारला आहे.

ट्विटरवरून राहुल गांधी यांनी प्रश्न विचारले आहेत, पुलवामा हल्ल्यामुळे सर्वाधिक फायदा कुणाला झाला? पुलवामा हल्ल्याच्या चौकशीतून काय निष्पण्ण झाले आणि सुरक्षेत तो हलगर्जीपणा दाखवला त्यात मोदी सरकार मधील कोण जबाबदार आहे? असे प्रश्न राहुल गांधींनी विचारले आहेत.

राहुल गांधी यांच्यापूर्वी माकप नेते मोहम्मद सलीम यांनीही पुलवामा हल्ल्याप्रकरणी केंद्र सरकारवर टीका केली होती. आम्हाला जवानांचे स्मारक नको तर आंतराष्ट्रीय सीमेवर 80 किलो स्फोटकं कशी आली याचे उत्तर हवे असे सलीम यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या