
सामना ऑनलाईन,इंफाळ
मणिपूरच्या पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात असलेल्या पोलीस शस्त्रागारातून चोरीला गेलेल्या पिस्तुलांप्रकरणी काँग्रेसच्या आमदाराला अटक केली आहे. २०१६-२०१७ साली या कार्यालयातून ५६ पिस्तुलं आणि ५८ मॅगझिन चोरीला गेली होती. याच प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने काँग्रेस आमदार यामथूंग हाओकिनच्या घरावर छापा मारला होता. छापेमारीनंतर हाओकिपला अटक करण्यात आली असून त्याला १५ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं आहे. हाओकिप आणि मणिपूरमधल्या सशस्त्र कट्टरपंथी संघटनांनी ही शस्त्रात्रं पळवल्याचं तपासात समोर आलं होतं. आत्तापर्यंत वेगवेगळ्या आरोपींकडून १४ पिस्तुलं जप्त करण्यात आली आहे.


























































