भरसभेत पंतप्रधानांना दिली गलिच्छ शिवी, काँग्रेस खासदाराचा प्रताप कॅमेऱ्यात कैद

5365

राज्यातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांची जीभ घसरली आहे. भरसभेत बोलताना धानोरकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवी दिली. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसच्या धरणे आंदोलनात खासदार बाळू धानोरकर यांनी पंतप्रधान मोदींना गलिच्छ शिवी दिली. मोदी महिलांच्या सोने-दागिन्यांवर टपून असल्याची टीका करताना त्यांचा तोल गेला. या टीकेवर कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्याने खासदार जोशात आले. मात्र आपण काय बोलून गेलो, याचे भान मात्र त्यांना राहिले नाही.

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील भाजपचे पराभूत उमेदवार हंसराज अहीर यांनाही धानोरकर यांनी ‘कोळसा चोर’ म्हणून संबोधले. भाजप सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने आज धरणे आंदोलन करण्यात आले. मात्र या आंदोलनात विजय वडेट्टीवार आणि सुभाष धोटे हे दोन्ही आमदार अनुपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या