
काँग्रेसचे भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कारचा सोमवारी पहाटे भीषण अपघात झाला. राजधानीमध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी प्रशांत पडोळे हे दिल्लीला निघाले होते. त्याचवेळी हा अपघात झाला. खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली असून या अपघातातून ते थोडक्यात बचावले आहे. मात्र त्यांच्या कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे दिल्लीला जाण्यासाठी सुरक्षारक्षक आणि चालकासह सोमवारी पहाटे नागपूर विमानतळाकडे मार्गस्थ झाला हेतो. याचवेळी नागपूर जिल्ह्यातील हल्दीरामसमोर भरधार ट्रकने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. ही घडक एवढी जोरदार होती की यात पडोले यांच्या कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. नशीब बलवत्तर म्हणून प्रशांत पडोळे हे या अपघातातून बचावले आहे. मात्र त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.
VIDEO | Bhandara, Maharashtra: Congress MP Prashant Padole escapes unhurt after his car was hit by a truck while travelling to Nagpur last night.
(Full video available on PTI Videos – https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/QeJEpqr6aC
— Press Trust of India (@PTI_News) March 30, 2026
दरम्यान, अपघातानंतर प्रशांत पडोळे यांनी एका दुचाकीस्वाराला लिफ्ट मागितली आणि नागपूर गाठले. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर ते पुन्हा नागपूर विमानतळाकडे आले आणि नंतर दिल्लीला रवाना झाले.
दुसऱ्यांदा अपघात
खासदार प्रशांत पडोळे यांच्या कारचा नागपूर येथे काही महिन्यांपूर्वीही अपघात झाला होता. या अपघातात ते किरकोळ जखमी झाले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्या कारचा अपघात झाल्याने खळबळ उडाली. हा अपघात नेमका कसा झाला याबाबत अद्याप तपशील मिळालेला नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.































































