महाभ्रष्ट महायुती सरकारवर चिखलफेक: काँग्रेस आक्रमक, सरकारविरोधात रस्त्यावर उतरून निदर्शने

>> प्रसाद नायगावकर

राज्यभरात आज काँग्रेस चांगलीच आक्रमक झालेली आहे. काँग्रेसने शुक्रवारी राज्यभरात भाजप आणि महायुतीच्या सरकारचा विरोध दर्शवत रस्त्यावर उतरून निदर्शने केली आहेत. जिल्ह्यात, तालुक्यात या भाजपा पक्षाचे सरकार विरोधात चिखल फेक आंदोलन यवतमाळ शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने संविधान चौक, जुन्या बस स्टँड जवळ शुक्रवारी करण्यात आले.

या आंदोलनाला काँग्रेसने चिखल फेक आंदोलन असे नाव दिले आहे. नीटच्या परीक्षेसंदर्भात जो काही भ्रष्टाचार झाला त्याची चौकशी व्हायला पाहिजे, अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची मागणी आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी भाजपने देखील रस्त्यावर उतरून नाना पटोले यांचा निषेधार्थ मोर्चा काढला होता. त्यावेळी नाना पटोले यांच्या फोटोला चिखल लावत त्यांनी कार्यकर्त्यांकडून पाय धुवून घेतले, असा आरोप करत. त्या कृत्याचा भाजपने निषेध केला होता. त्याच अनुषंगाने शुक्रवारी काँग्रेस देखील भाजप विरोधात आक्रमक झाली आहे.

यावेळी आंदोलना दरम्यान शहर अध्यक्ष चंदू चौधरी, प्रवीण देशमुख, जावेद देशातील व राज्यातील समस्त अन्सारी, अरुण राऊत, ओम तिवारी,उषा ताई दिवटे, रामटेके ताई, मीनाक्षी सावळकर, दिनेश हरणे पाटील, कैलास सुलभेवार, स्वाती येंडे, प्रियंका बिडकर, नितीन जाधव, अनिल गायकवाड दिनेश गोगरकर आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्ह्यातील व शहरातील समस्त पदाधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी होऊन उत्स्फूर्त सहभाग घेतला.