आरएसएस, भाजपचा इरादा खतरनाक! आरक्षणाच्या मुद्द्यावरून प्रियंकांचे ट्वीट

531

काँग्रेसच्या सरचिटणीस आणि उत्तर प्रदेश (पूर्व) प्रभारी प्रियंका गांधी वढेरा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षावर आरक्षणाच्या मुद्द्यावरून टीका केली आहे. आरएसएस आणि भाजपचे इरादे खतरनाक असून आरक्षणाचा मुद्दा बनवून हे सामाजिक न्यायावर निशाणा साधू इच्छित असल्याची टीका प्रियंका यांनी ट्विटरवरून केली आहे.

आरएसएसचा आत्मविश्वास वाढला आहे आणि त्यांचा इरादा खतरनाक आहे. भाजप सरकार एक-एक करून सार्वजनिक हितांसाठीच्या कायद्यांचा गळा घोटत असतानाच आरएसएसने आरक्षणाचा मुद्दा उचलून धरला आहे. यावरील चर्चा फक्त बहाना आहे, परंतु आरएसएस, भाजपचे खरे लक्ष्य सामाजिक न्यायावर आहे, असे ट्वीट प्रियंका गांधी वढेरा यांनी केले. तसेच तुम्ही असे होऊ द्याल का? असा सवालही त्यांनी नागरिकांना केला आहे.

सरसंघचालकांच्या वक्तव्यावरून वाद
सरसंघचालक मोहन भागव यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर केलेल्या वक्तव्याचे पडसाद सर्वत्र उमटत आहेत. एका कार्यक्रमामध्ये आरक्षणावर पुर्नविचार करण्याचे विधान त्यांनी केले होते. याला विरोध करणाऱ्यांनी आणि याचे समर्थन करणाऱ्यांना आपला मुद्दा मांडावा असेही ते म्हणाले होते. सरसंघचालकांच्या वक्तव्यानंतर तेजस्वी यादव यांनी देखील ट्वीट करून टीका केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या