भाजपच्या खासदाराकडून माजी सैनिकाला मारहाण; फडणवीस सरकारकडून दखल नाही!

2016 मध्ये जळगाव येथील माजी सैनिक सोनू महाजन यांच्याकर भाजपाचे तत्कालीन आमदार व आताचे खासदार उन्मेष पाटील यांच्या आदेशावरून हल्ला करण्यात आला. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस असताना महाजन यांना झालेल्या मारहाणीचा एफआयआर सुद्धा दाखल करण्यात आला नव्हता, असा आरोप प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. त्यांना झालेल्या मारहाणीची संरक्षणमंत्र्यांनी दखल घेतलेली नसून मुंबईत निवृत्त अधिकाऱ्याच्या न्यायासाठी धडपडणारा भाजप सोनू महाजनांना न्याय कधी मिळवून देणार, असा सवाल सावंत यांनी केला आहे.

मुंबईत निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरुन आकांडतांडव करणाऱ्या भाजपाला सैनिकांबद्दल फार कळवळा आहे असे नाही. सैनिकांप्रती त्यांना खराच आदर असता तर जळगाव मधील माजी सैनिक सोनू महाजन यांना न्यायासाठी चार वर्षांपासून भटकावे लागले नसते. महाजन यांच्यावर 2016 साली भाजपाचे आमदार उन्मेष पाटील जे आता खासदार आहेत त्यांच्या आदेशावरून हल्ला करण्यात आला. राज्यात त्यावेळी फडणवीस यांचे सरकार होते, तेच गृहमंत्रीही होते, तरीही एफआयआर सुद्धा दाखल करुन घेतला नाही. उच्च न्यायालयाने 2019 मध्ये आदेश दिल्यानंतर एफआयआर दाखल करण्यात आला. परंतु आजपर्यंत उन्मेष पाटील यांच्यावर पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही, असे सावंत यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या