हमारे देश की बेटिया, पंतप्रधानांचा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसची टीका

pm-modi-jacket

दिल्लीतील नवीन संसद भवनाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळीच गेल्या महिना भरापासून जंतरमंतरवर सुरू असलेल्या कुस्ती पटूनी नव्या संसद भवनावर मोर्चा काढला. तो मोर्चा पोलिसांनी दडपून टाकत कुस्तीपटू ना फरफटत ताब्यात घेतले. त्यावरून काँग्रेसने भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

 

काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत पंतप्रधानांवर टीका केली आहे. या व्हिडिओत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विनेश फोगाटला “तू तर माझ्या कुटुंबातील एक आहे” असं सांगताना दिसत आहेत. तसंच, “तुझ्या संपूर्ण कुटुंबाला ओळखतो”, असंही सांगितले. यावेळी मोदी “तुला मी निराश पाहू शकत नाही”, असंही मोदी या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहेत. या व्हिडीओ सोबत आजच्या आंदोलनातील दडपशाहीचे काही फुटेज देखील या व्हिडिओत टाकण्यात आले आहेत. त्या सोबत देश की बेटीया अशी उपरोधिक पोस्ट टाकली आहे.