
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुलना क्रूरकर्मा औरंगजेबाशी केली आहे. औरंगजेब क्रूर शासक होता, आज देवेंद्र फडणवीसही तेवढेच क्रूर आहेत, त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसून टाकायचा आहे, अशी टीका सपकाळ यांनी केली आहे.
महाराष्ट्रात ‘गँग्ज ऑफ सरकार’
टोळ्या एकत्र येऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले आहे, त्यामुळेच मंत्र्यांमध्ये बेबनाव आणि अहंकाराचा खेळ सुरू आहे, असे म्हणत, ‘गँग्ज ऑफ वासेपूर’प्रमाणे ‘गँग्ज ऑफ सरकार’ महाराष्ट्रातील सत्तेत बसले आहे, असा आरोप सपकाळ यांनी केला.