
अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाचे कारण सांगून देशात कृत्रिम गॅस टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप करत या गॅस टंचाईविरोधात सोमवारपासून सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याचा इशारा मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीने दिला आहे.
युद्धामुळे नव्हे तर केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. याविरोधात मुंबई प्रदेश काँग्रेस कार्यालयाबाहेर उद्यापासून रोज सकाळी 11 ते 5 वेळेत सत्याग्रह आंदोलन केले जाणार आहे. अमेरिकेबरोबर केलेला व्यापार करार रद्द करा अशी या आंदोलनाची मागणी आहे.
























































