
सामना प्रतिनिधी । रत्नागिरी
मुंबई-गोवा महामार्गावरून जाणार कंटेनर पलटी होऊन अपघात झाला. लांजा तालुक्यातील वाकेड येथे हा अपघात झाला. चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर हा कंटनेर पलटी झाल्याने कामगाराचा मृत्यू झाला.
कंटनेर चालकाचे नियंत्रण सुटून रस्ता सोडून कंटेनर चौपदरी रस्त्याला खोदाई केलेल्या ठिकाणी पलटी झाला. खोदाईचे काम करणाऱ्या मजूराच्या अंगावर हा कंटेनर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला































































