धर्मांतर, लव्ह जिहादविरोधी कायदा लवकरच; पीडितेसंबंधी तत्काळ तक्रार नोंद, शोधासाठी जलद कारवाईची तरतूद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Devendra fadanvis chief minister maharashtra

धर्मांतर किंवा लव्ह जिहाद प्रकरणांची नोंद आणि शोध जलदगतीने करण्यासाठी पोलीस महासंचालकांना सांगून पोलिसांसाठी एसओपी तयार केली जाईल. राज्य सरकार लवकरच लव्ह जिहाद विरोधी कायदा करणार असल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

विधान परिषदेत गोपीचंद पडळकर यांनी पालघर जिह्यातील डहाणूमध्ये आदिवासी महिलेने दाखल केलेल्या धर्मांतरविरोधी तक्रारीबाबत लक्षवेधीच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला होता. सरकारने स्थापन केलेल्या आंतरधर्मीय विवाह परिवार समितीकडे आतापर्यंत किती तक्रारी आल्या असून त्यावर सरकारने काय कारवाई केली आहे याची माहिती सरकारने द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

– गोल्डन अवरमध्ये कारवाई झाली पाहिजे
शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटनेते अनिल परब यांनीही धर्मांतर आणि लव्ह जिहादप्रकरणी पोलिसांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. अपघातात जसा गोल्डन अवर महत्त्वाचा असतो ज्यात जखमी व्यक्तीचा प्राण वाचतो तसे या प्रकरणातही बेपत्ता मुलगा किंवा मुलीचा शोध तत्काळ अशा घटना टाळा.

– संयुक्त चिकित्सा समिती स्थापन करा
लव्ह जिहाद प्रकरणांची नोंद करून त्याचा एक अभ्यास अहवाल तयार करावा. त्याचबरोबर गटनेते, समाजातील विचारवंत, या विषयात काम केलेल्या लोकांना बरोबर घेऊन संयुक्त चिकित्सा समिती तयार करून लव्ह जिहाद कायद्याबाबत निर्णय करावा, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱहे यांनी दिले.