नाशिकला कोथिंबीर 98 रुपये जुडी

681

कोथिंबीरची आवक घटत चालल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत हायब्रीड कोथिंबिरीला शनिवारी कमाल 98, तर गावठी कोथिंबिरीला 90 रुपये प्रतीजुडी असा भाव मिळाला.

नाशिक जिल्ह्यातील काही भागात पावसामुळे शेतातच पालेभाज्या खराब होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे गेल्या पंधरवडयापासून नाशिक बाजार समितीतील पालेभाज्यांची आवक कमी होत आहे. येथे शुक्रवारी कोथिंबिरीची आवक 85 हजार तीनशे जुडी होती. गावठी कोथिंबिरीला कमाल 60 तर हायब्रीडला 55 रुपये प्रतीजुडी दर मिळाला होता. शनिवारी संध्याकाळी पालेभाज्यांच्या लिलावावेळी कोथिंबिरीची आवक एका दिवसात नऊ हजार शंभर जुडयांनी कमी आली. ही आवक 76 हजार 200 जुडय़ा इतकीच होती. गावठी कोथिंबिरीला किमान 20, कमाल 90 व सरासरी 65 तर हायब्रीडला किमान 15, कमाल 98 व सरासरी 50 रुपये दर मिळाला.

इतर पालेभाज्यांचे प्रतिजुडी दर

कमाल     किमान   सरासरी

मेथी

 10  35 25

आवक : 16500

शेपू

 12  33 22

आवक : 13200

पालक

2.50      5.50   4.50

आवक : 1600

कांदापात

 15  50 42

आवक : 12000

आपली प्रतिक्रिया द्या