कोरोना अलर्ट : जिल्ह्यात विदेशातून आलेले 42 नागरिक ‘होम क्वारंटाईन’

940
Coronavirus scare
प्रातिनिधिक फोटो

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्ह्यात तीन आयसोलेशन कक्ष सज्ज ठेवले आहेत. तसेच विदेशातून आलेल्या नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून निरीक्षणाखाली ठेवण्यात येत आहे. त्यानुसार बुधवार दि. 18 मार्च 2020 पर्यंत विदेशातून आलेल्या 33 भारतीय नागरिकांना त्यांच्या घरीच स्वतंत्र खोलीत निरीक्षणाखाली (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले होते. तसेच आज दि. 19 मार्च 2020 रोजी 9 नवीन नागरिकांना त्यांच्या घरीच निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 42 नागरिक ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे.

दुबई येथून आलेले मलकापूर येथील रहीवासी (40) यांना बुलढाणा जिल्हा सामान्य रूग्णालयात आयसोलेशन कक्षात संशयीत म्हणून दाखल करण्यात आले होते. त्यांचा रिपोर्ट नागपूर येथील प्रयोगशाळेतून निगेटीव्ह आला आहे. खामगांव येथील आयसोलेशन कक्षात एकही संशयीत दाखल नाही. अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली आहे

आपली प्रतिक्रिया द्या