कोरोना रोखण्यासाठी भारुडाच्या माध्यमातून राहुल साबने यांची जनजागृती

400

कोरोनाने जगभराच थैमान घातले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाछी आरोग्य विभागाने नागरिकांना सूचना केल्या आहेत. कोरोना रोखण्यासाठी काय करावे, याबाबतच्या सूचनाही आरोग्य यंत्रणेने दिल्या आहेत. त्याचप्रमाणे विविध संस्था आणि अनेकजण कोरोनाबाबत जनजागृती करत आहेत. गंगाखेड येथील राहुल साबने भारुड आणि लोकगीतातून फेसबुक, व्हॉटसअॅपसारख्या सोशल मिडियाचा वापर करत जनजागृती करत आहेत.

कोरोनाबाबत जनजागृतीसाठी अनेकजण पुढे येत आहेत. विविध कलांचा वापर करत सोशल मिडीयाद्वारे जनतेपर्यंत आवश्यक ती माहिती पोहचवण्यात येत आहे. गंगाखेड येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल साबने आपल्या गीताच्या माध्यमातू जनजागृती करत आहेत. त्यांनी भारुडासारखी गीते करून भारुडात करतात तशी वेषभूषा करत भारुड सादर केले आहे. ‘कोरोंना आपल्या जीवावर बेतलाय रं.., पोलीसवाले मामाचे नियम पाळा, सर्वांनी घरीच रहा, संसर्गाचा आजार ओळखा’, अशा गीतरचना सादर केल्या आहेत. ते घरातूनच सोशल मिडीयाद्वारे भारूड सादर करून जनजागृती करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या