यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात श्वास रोखायला लावणारे मोटरसायकल स्टंट्स नाहीत

कोरोना महामारीच्या थैमानामुळे यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहोळ्यात उपस्थितांना श्वास रोखायला लावणारे लष्कराच्या मोटरसायकलस्वारांचे स्टंट्स पाहायला मिळणार नाहीत. शिवाय कोरोना प्रतिबंधांतील सोशल डिस्टन्सिंगमुळे यंदा 26 जानेवारीचे संचलन पाहायला येणाऱ्या पाहुण्यांची संख्याही 25 हजारांवर आणण्यात आली आहे. कोरोना प्रतिबंधांमुळे यंदाच्या 72 व्या प्रजासत्ताक दिन परेडमध्ये साहस पुरस्कार पटकावणारे जवान, नागरिक आणि शौर्यपदके मिळवणारे बालवीरही सहभागी होणार नाहीत. प्रतिवर्षी या सोहळ्याला उपस्थित राहणाऱ्यांची संख्या 1 लाख 25 हजार असते ती आता 25 हजारांवर आणण्यात आली आहे. यंदाच्या राजपथावरील संचलनात 17 राज्यांच्या चित्ररथांसह एकूण 32 चित्ररथ सहभागी होणार आहेत.

 

आपली प्रतिक्रिया द्या