वरळीत शिवसेनेचे 101 वे रक्तदान शिबीर

वरळी शिवसेना शाखेच्यावतीने दरमहा 17 तारखेला रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार उद्या 17 मे रोजी 101 वे रक्तदान शिबीर वरळी नाका येथील शाखेत आयोजित करण्यात आले आहे. सांयकाळी 5 ते 8 वाजेपर्यंत हे शिबीर सुरु राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजक नगरसेवक अरविंद भोसले यांनी केले आहे. तरी अधिक माहितीसाठी 9821581860 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या