मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढतील; विजय औटी यांचा विश्‍वास

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संयमी आणि आत्मविश्‍वास असलेले मुख्यमंत्री आहेत. तेच महाराष्ट्राला कोरोनाच्या संकटातून बाहेर काढतील, असा विश्‍वास विधानसभेचे माजी उपाध्यक्ष विजय औटी यांनी व्यक्त केला. नारायणगव्हाण येथे 10 लाख रूपये खर्चून बांधण्यात आलेल्या सामाजिक सभागृहाचे औटी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. कृषी व बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते, सभापती गणेश शेळके, डॉ. श्रीकांत पठारे, विकास रोहकले, बाबासाहेब तांबे, रामदास भोसले, नितीन शेळके, राहुल शिंदे, सरपंच सुरेश बोऱ्हुडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

ज्या माणसाने कधी विधानसभेचे तोंडही पाहिले नव्हते, तोच माणूस जनतेला संकटाच्या काळात धीर देतोय, आश्‍वस्त करतोय, अशा स्थितीत आपण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे. लॉकडाऊनमुळे ठप्प झालेला महाराष्ट्र उद्धव ठाकरे पुन्हा एकदा उभा करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नारायणगव्हान व परिसरातील विकास कामांचा औटी यांनी आढावा घेतला. उपसरपंच विलास खोले, ग्रामपंचायत सदस्य काशिनाथ नवले, अण्णा चव्हाण, मनिषा शेळके, भारती चिपाडे, विमल नाईक, विष्णू दरेकर, बबन खोले, मेजर गाडीलकर, बबन गायकवाड, बाळू गोरे, सहादू शेळके, हुसेन शेख, भानुदास वेताळ, छबूशेठ चिपाडे, तारा दरेकर, हे यावेळी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या