कोरोनाशी लढण्यासाठी माजलगावात रक्तदान शिबिर

736

जागतिक संसर्गजन्य रोग म्हणून घोषित केलेल्या कोरोना व्हायरसचा समर्थपणे मुकाबला करण्यासाठी गुरुवारी माजलगाव शहरात आयोजित रक्तदान शिबीराची सुरुवात उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत ढीसले यांनी स्वतः पासून रक्तदान करून केली. सकाळपर्यंत दीडशे जणांनी रक्तदानासाठी नोंदणी केली असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

कोरोनाचा जागतिक कहर झाल्यानंतर आपल्या देशात मोठ्या प्रमाणात काळजी घेतली जात आहे. या लढ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न शासन स्तरावर होत आहेत, त्यास जनतेची साथ मिळत आहे. या लढ्यासाठी बीड जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रक्तदान शिबिर घेण्याच्या केलेल्या आवाहनाला येथे प्रतिसाद मिळाला आहे.
येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी आमदार प्रकाश सोळंके, सभापती अशोक डक, वैद्यकीय अधीक्षक सुरेश साबळे, व्यापारी महासंघाचे सुरेंद्र रेदासनी, अनंत रुद्रवार, ऍड. बंडू डक,गणेश लोहिया, नंदू आनंदगावकर, माहेश्वरी सभेचे प्रा.कमलकिशोर लड्डा, उमेश जेथलिया,भास्कर गिरी यांचे उपस्थितीत सकाळी 11 वाजता रक्तदान शिबीर सुरू झाले. बीड जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीचे पथक व तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल परदेशी,डॉ गजानन रुद्रवार यांच्या निगराणी खाली सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी व सर्व थरातील नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत, त्यामुळे नोंदणी दीडशे जणांची असली तरी किमान दोनशे जणांचे रक्तदान या शिबिरात होन्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या