कोरोनामुळे पुण्यात मास्कचा वापर करणे अनिवार्य, पोलिसांचे आदेश

457

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वांना मास्क घालणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी आदेश काढला आहे. त्यामुळे मास्क न घालता बाहेर पडल्यास नागरिकांवर कारवाई करण्यात येणार आहे.

राज्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस यामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने नागरिकांना मास्क घालणे अनिवार्य करण्याचे केले आहे. त्यानुसार आता राज्य शासनाने सर्व पोलिसांना सूचना दिल्या आहेत. पुणे शहरात आज दिवसभरात 25 रुग्ण वाढले आहेत. तर 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे शहरातील काही भाग सील केला आहे. दरम्यान आता सर्व नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्क घालूनच बाहेर पडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

साथीचे रोग अधिनियम मधील तरतूद व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलमनुसार मास्क घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता अत्यावश्यक सेवा देणारे, किराणा दुकानदार किंवा घराबाहेर पडणारे नागरिक यांनी मास्क घातल्याशिवाय घराबाहेर पडू नये असे सांगण्यात आले आहे. शहरात मास्क न घालता घराबाहेर पडणाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या