‘आयपीएल’वर निर्णय कधी? बीसीसीआयकडे साऱ्यांच्या नजरा

867

कोरोनाव्हायरसचा वाढता प्रभाव लक्षात घेता जगभरातील मोठमोठ्या क्रीडा संघटनांनी विविध क्रीडा स्पर्धांचे यंदाचे आयोजन रद्द केले आहे किंवा काही संघटनांनी हे आयोजन एक वर्षापर्यंत पुढे ढकलले आहे. ऑलिंपिक सारख्या जागतिक स्तरावरील सगळ्यात मोठ्या क्रीडा स्पर्धेला देखील याचा फटका बसला आहे. ऑलिंपिकची स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे, विम्बल्डन टेनिस स्पर्धा देखील रद्द करण्यात आली आहे. मात्र हिंदुस्थानातील आयपीएलच्या स्पर्धांचे काय होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. बीसीसीआय अजूनही सरकारच्या पुढच्या निर्णयांचीची वाट बघत आहे की काय असा प्रश्न आता विचारला जाऊ लागला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे आयोजन 15 एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे जाहीर केले होते. यादरम्यान देशातील परिस्थिती सुधारेल आणि 15 एप्रिल नंतर आयपीएलचे आयोजन करता येईल येईल असा बीसीसीआयचा अंदाज होता. मात्र गेल्या काही दिवसात देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या चिंताजनकरित्या वाढली आहे. हे लक्षात घेता देशातील अनेक राज्य सरकारांनी लॉकडाऊन वाढवण्यात यावेत येत असे मत मांडले आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील लॉकडाऊन वाढवण्यावर विचार करत आहे.

देशात पहिल्यांदाच होणारा फिफा अंडर 17 महिला फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन रद्द करण्यात आले आहे. जागतिक स्तरावरील क्रीडा स्पर्धा म्हणजेच ऑलिंपिक पुढे ढकलण्यात आले आहे, असे असतानाही
आयपीएल संदर्भात मात्र निर्णय का घेतला जात नाही ही असा प्रश्न समाज माध्यमातून विचारला जात आहे.

याआधी बीसीसीआयने बंद स्टेडियम मध्ये प्रेक्षकांशिवाय सामने खेळण्याचा विचार केला होता. फ्रॅन्चाईजी देखील यासाठी तयार होते, मात्र परदेशी खेळाडूंशी शिवाय खेळण्यास त्यांनी नकार दिला होता. जगभरात एवढी गंभीर परिस्थिती असताना परदेशी खेळाडू देशात कसे आणणार आणि आणि ते करणे बिलकुल चूक असल्यामुळे बंद स्टेडीयममध्ये सामने खेळण्याचे शक्यतादेखील मावळली आहे. माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी बंद स्टेडीयममध्ये सामने खेळण्याच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. प्रेक्षक नसताना कोणताही कलाकार कला सादर करेल तर ते कसे वाटेल असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते. तर हिंदुस्थानी क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी सहा महिन्या करता स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलण्याची सूचना केली होती. सध्या देशातील रुग्णांची संख्या कमी होण्यावर काम करणे आवश्यक आहे, त्यावरच आपला जोर असला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट करत स्पर्धांचे आयोजन थांबवण्या वरच जोर दिला. त्यामुळे आता बीसीसीआय काय आणि कधी निर्णय घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या