कोरोना व्हायरसची दहशत, चक्क घोड्याला केले क्वारंटाइन!

616

!

कोरोना व्हायरसची दहशत एवढी की आता प्राण्यांनाही विलगीकरण केले जात आहे. जम्मू-कश्मीरात राजौरी येथे एका घोडय़ाला चक्क क्वारंटाइन करण्यात आले आहे.

रेड झोन असलेल्या शोफियान येथून एकजण आपल्या घोडय़ावर राजौरी येथे घरी आला. त्या व्यक्तीची कोविड-19 चाचणी घेवून क्वारंटाइन करण्यात आले. राजौरी हे ग्रीन झोनमध्ये आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून घोडय़ालाही इतर प्राण्यांपासून विलगीकरण करण्यात आले आहे. त्याला घराच्या परिसरातच क्वारंटाइन केल्याचे सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

प्राण्यांना कोरोना होऊ शकतो का?
प्राण्यांनाही कोरोना होऊ शकतो का? यावर अद्याप ठोस निष्कर्ष निघालेला नाही. मात्र, जर एखाद्या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात प्राणी आला, तर खबरदारीचा उपाय म्हणून प्राण्यालाही विलगीकरण केले जात आहे. आता घोडय़ाच्या प्रकृतीची तपासणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या