कोरोनाग्रस्त डॉक्टरांसाठी स्वतंत्र उपचार केंद्रे सुरू करा! महाराष्ट्र आयुष प्रॅक्टिशनर्स असोसिएशनची मागणी

84

कोरोना संसर्गाने बाधित झालेल्या डॉक्टरांसाठी मुंबई आणि इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी स्वतंत्र उपचार केंद्रे सुरू कराकीत अशी मागणी महाराष्ट्र आयुष प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

कोरोना संक्रमण काळात अत्यावश्यक सेवा म्हणून खासगी डॉक्टरांनी दवाखाने सुरू ठेवावेत असा आदेश राज्य सरकारने काढला. त्यानुसार खासगी प्रॅक्टिस करणार्‍या सर्व आयुष डॉक्टरांनी सरकारला सहकार्य करून आपले दवाखाने सुरू ठेवले. परंतु दुर्दैवाने आता डॉक्टरांनाच कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशा वेळी डॉक्टरांना खासगी रुग्णालयात दाखल होऊन स्वखर्चाने उपचार करून घ्यावे लागत आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित डॉक्टरांसाठी शासनाने स्वतंत्र उपचार केंद्रे मुंबई व इतर जिल्ह्याचा ठिकाणी तातडीने सुरू करावीत अशी मागणी असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष डॉ. दिलीप कदम, सरचिटणीस डॉ. अनिल साळुंखे, सचिव डॉ. हेमंत अडसूळ, संघटक डॉ. संजय गोसावी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तसेच रूग्णांना सेवा देत असताना कोरोना संसर्गामुळे ज्या आयुष डॉक्टरांचा मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याची मागणीही करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या