Live Corona Update- गुजरात येथे 61 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू

3855
 • शनिवारी राज्यात 145 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 635 वर पोहोचली आहे.

 • देशात कोरोनाची रुग्णांची संख्या 3 हजार 72 वर पोहोचली असून आतापर्यंत 75 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

 • भोपाळमध्ये आरोग्य विभागातील दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण
 • कोरोना’ चा मुकाबला करण्यासाठी कल्याण डोंबिवली महापालिका ड्रोनचा वापर करणार
 • देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 3072 वर, 24 तासात वाढले 525 रुग्ण
 • मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा 330 वर
 • तामिळनाडूतील कोरोनाबाधितांची संख्या 485 वर
 • तामिळनाडूत गेल्या 24 तासात 74 कोरोनाग्रस्त आढळले, त्यातील 73 हे तबलिकी जमातचे आहेत
 • नगरमधील दुसरा रुग्ण कोरोनामुक्त, वैद्यकीय उपचारानंतर सोडले घरी
 • पण हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा लोकं सहकार्य करतील – आरोग्यमंत्री

 • महाराष्ट्रातील लॉकडाऊन टप्प्या टप्प्याने उठवणार – आरोग्यमंत्री राजेश टोपे

 • महाराष्ट्रात 25 हजार परसनल प्रोटेक्शन इक्विपमेंट किट आहे. 25 लाख एन95 मास्क , 25 लाख ट्रिपस लेयर मास्क, 1500 व्हेंटिलेटर्स आहेत. – राजेश टोपे
 • तबलिकी जमातशी संबंधित 22 हजारहून अधिक लोकांना क्वारंटाईन केले आहे
 • हिंदुस्थानातील कोरोनाग्रस्तांचा आकडा इतर देशांच्या तुलनेत कमी वाढतोय – आरोग्य मंत्रालय
 • देशभरात तबलिकी जमातमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1023 वर

 • गेल्या 24 तासात देशभरात 601 कोरोनाग्रस्त आढळले, 12 जणांचा मृत्यू
 • हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे, कोरोनाविरोधात लढणार आणि जिंकणार- मुख्यमंत्री
 • आपण त्याच्यासमोर गुडघे टेकायचे नाहीत.
 • आत्मविश्वासासारख्या शस्त्रानिशी लढणाऱ्या पोलादी एकजुटीवरती कोरोनाने धडका माराव्यात
 • माझ्यात आणि तुमच्यात आत्मविश्वास आहे.
 • हे नियम पाळूनच आपण आपला बचाव करू शकतो.
 • आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका
 • जे घरातून काम करू शकतात, त्यांनी घरातूनच काम करा
 • घरात राहून मानसिक अस्वस्थता येत असणार
 • गर्दीत असतानाही अंतर ठेवा, त्यामुळे धोका अंतरावर राहिल
 • भाजीमार्केट 24 तास उघडी आहेत, गर्दी करू नका
 • जीवनावश्यक खरेदीसाठी जाताना मास्कचा वापर करा, ज्यांच्याकडे मास्क नसतील त्यांनी स्वच्छ कपड्याने तोंड नाक झाका
 • विलगीकरणात असलेल्या रुग्णांना आवाहन, शिस्त पाळा
 • हे आता आपल्याला पाळावच लागेल
 • कोविडसाठीची रुग्णालये, चाचणी केंद्रात जा
 • दुर्दैवाने जर कुणी कोविडग्रस्त असेल तर हा संसर्ग पसरण्याची शक्यता आहे.
 • जर सर्दी, ताप खोकला अशी लक्षणं असतील तर नेहमीच्या डॉक्टरकडे जाऊ नका,
 • जिल्ह्याजिल्ह्यात फक्त कोविडसाठी काम करणारी रुग्णालयं वाढवण्यात येत आहेत.
 • एकजूट हा मुंबई-महाराष्ट्राचा स्थायीभाव
 • जिल्ह्या जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढवत आहोत.
 • आपली सोय आहात तिथेच केली जाईल, याची जबाबदारी सर्व राज्यांनी घेतली आहे.
 • इतर राज्यात अडकलेल्या बांधवांनो, तिथेच रहा, गैरसोय होत असेल तर मुख्यमंत्री कार्यालयाला कळवा
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे इतर राज्यांतील मुख्यमंत्र्यांना आवाहन
 • माझ्या महाराष्ट्रातीलही काही जण तुमच्या राज्यात असतील, तर त्यांच्या सोयीची आणि सुरक्षेची जबाबदारी घ्या
 • सर्व मुख्यमंत्र्यांना माझी ग्वाही आहे. जर याव्यतिरिक्त माहिती असेल तर ती कळवावी
 • कोणालाही कुठेही जाण्याची आवश्यकता नाही.
 • यांमधील माता भगिनी आणि बालकांसाठी वेगळी सोय करण्यात आली आहे.
 • राज्यातील पाच लाख मजुरांसाठी निवारा, दोन वेळचे जेवण, नाश्ता आणि वैद्यकीय सोय पुरवण्यात आली आहे.
 • सर्व धर्मियांनी उत्सव आपापल्या घरी साजरे करावेत.
 • अशा कार्यक्रमांना परवानगी दिली जाणार नाही.
 • यापुढील सूचना येईपर्यंत कोणताही धार्मिक, राजकीय कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा होणार नाहीत
 • कुणाला माहिती असेल त्याने ती स्वतःहून सरकारला द्यावी
 • त्यापलिकडे जर कुणी आलं असेल, तर स्वतःहून माहिती द्या- मुख्यमंत्र्यांचं आवाहन
 • दिल्ली येथील कार्यक्रमातून महाराष्ट्रात आलेले 100 टक्के लोक विलगीकरण कक्षात – मुख्यमंत्री
 • कार्यक्रमाला आधी परवानगी देण्यात आली होती, मात्र नंतर ती रद्द करण्यात आली, म्हणून महाराष्ट्रात हे झालं नाही
 • दिल्लीत जे घडलं ते आपण महाराष्ट्रात होऊ दिलं नाही.
 • सर्वत्र हीच काळजी घेतली जात आहे.
 • कोणत्याही परिस्थितीत त्यांना संसर्ग होणं टाळलं पाहिजे.
 • घरातल्या घरात त्यांची सेवा करताना स्वच्छता पाळणं, हे सगळं आपण करू शकतो.
 • माता पिता, इतर ज्येष्ठ यांची काळजी घेणं, त्यांच्यापासून अंतर राखणं,
 • त्यामुळे लढाई आता जोमाने सुरू असताना आपल्या ज्येष्ठ कुटुंबीयांची काळजी घेणं गरजेचं आहे.
 • यातल्या बऱ्याच जणांना मधुमेह, रक्तदाब, हृदयविकारांसारख्या व्याधी होत्या
 • दुर्दैवाने जे मृत्यू झाले आहेत, त्यांपैकी बहुतांश ज्येष्ठ नागरिक आहेत.
 • म्हणजेच बरे होऊन घरी जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.
 • सर्वात आधी लक्षणं आढळलेले 51 जण बरे होऊन घरी जात आहेत.
 • महाराष्ट्रात 500च्या आसपास रुग्णांचा आकडा आहे
 • परिणामी रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
 • रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसून येतात का, हे तपासलं जात आहे.
 • चाचणी केंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे
 • महाराष्ट्रात कोरोनाच्या केसेस वाढत आहेत
 • महाराष्ट्राच्या एकजुटीला गालबोट लावण्याचा प्रयत्न मी करू देणार नाही
 • आज सगळे जातपात, धर्म विसरून एकजुटीने लढत आहेत
 • कुठल्याही प्रकारचे चुकीचे व्हिडीओ टाकणाऱ्यांना कायद्याच्या कचाट्यातून कुणीही वाचवू  शकणार नाही
 • कोविडपासून मी जनतेला वाचवेन, पण समाजाला पोखरण्याचे व्हिडीओ टाकणाऱ्यांची गय केली जाणार नाही
 • मी विनंती करेन ते जनतेला, त्यांना वाचवण्यासाठी मी आटोकाट प्रयत्न करत आहे.
 • अजून एका व्हायरस समाजाला पोखरत आहे.
 • जे संयम पाळून जिद्दीने लढत आहेत, त्यांना धन्यवाद
 • या सगळ्यांना मनापासून धन्यवाद
 • ताज, ट्रायडन्ट डॉक्टर्ससाठी खुली करण्यात आली आहेत
 • सर्व धर्मगुरू, मान्यवर, संस्था सगळे जण मदत करत आहेत
 • सगळेजण स्वतःच्या परीने मदत करत आहेत
 • शाहरुख खान यांनी आपली जागा मोकळी करून दिली आहे.
 • सर्व पक्षीय नेते. सर्व धर्माचे धर्मगुरू, कलाकार,खेळाडू आपल्यासोबत आहे.
 • यावर इलाज हा एकच आहे की नाईलाजाने घरात राहणे
 • जर ही समज सात वर्षाच्या मुलीला आली आहे तर आता आपण हे युद्ध जिंकलेच असे समजा
 • सात वर्षांच्या आराध्याची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत
 • आराध्याच्या सातव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
 • तमाम महाराष्ट्राच्या वतीने आशीर्वाद आणि कौतुक
 • लॉकडाऊनच्या काळात सगळे संयम दाखवत आहेत.
 • सोलापूरच्या आराध्या नामक मुलीचं कौतुक
 • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवेदन
 • दिल्लीतील तबलिगी समाजाच्या कार्यक्रमाला लावली होती उपस्थिती
 • छत्तीसगड येथे 16 वर्षे वयाच्या मुलाला कोरोनाची लागण
 • यांपैकी बहुतांश तबलिगींच्या मरकजशी संबंधित असल्याची माहिती
 • आसाममध्ये कोरोनाचा अजून एक रुग्ण सापडला, एकूण संख्या 25
 • सात दिवसांपासून एका वेळचा नाश्ता आणि दोन वेळचे जेवण अशी सोय करण्यात येत आहे.
 • बीडमधील उद्योजक संतोष सोहनींचा परराज्यातील मजूर आणि ऊसतोड कामगारांची भूक भागवण्याचा संकल्प
 • बीडमध्ये व्यापाऱ्यांकडून रोज अन्नदान,  550 गरजूंना मिळतेय दोन वेळचे जेवण
 • उर्वरित रुग्णांपैकी 1 जण अमरावती, 2 पुण्याचे तर 1 जण पिंपरी चिंचवड इथला आहे.
 • या 47 पैकी 28 रुग्ण मुंबईतले तर 15 जण ठाणे जिल्ह्याचे आहेत
 • महाराष्ट्रात कोरोनाचे 47 नवीन रुग्ण, राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 537वर
 • दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांची माहिती
 • वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्यांना आवश्यक असलेल्या कीटचा तुटवडा होण्याची शक्यता
 • दिल्लीत कोरोनाग्रस्तांचा आकडा 386 वर, 259 तबलिगींचा समावेश
 • 21 पैकी 17 जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले.
 • उत्तर प्रदेशातील महाराजगंज येथे तबलिगी जमातचे 6 जण कोरोनो पॉझिटिव्ह
 • एका कोरोनाग्रस्ताचा अहमदाबाद येथे मृत्यू
 • गुजरात येथे कोरोनाग्रस्तांची संख्या 105 वर, 10 जण मृत्युमुखी
 • उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आदेश
 • खादी कापडापासून बनवणार तिहेरी आवरणाचे 66 कोटी मास्क
 • दोघांनाही उपचारांनंतर रुग्णालयातून डिस्चार्ज
 • एक महिला आणि तिच्या पत्रकार वडिलांचा समावेश
 • मध्य प्रदेशमधील पहिल्या दोन रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह.
 • 183 जणांना उपचारांनंतर डिस्चार्ज
 • देशातल्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 2902वर, 68 जण मृत्युमुखी
 • एकूण 191 रुग्णांपैकी 41 जण तबलिगींच्या दिल्लीतील मरकजला गेल्याचा खुलासा
 • राजस्थानमध्ये बीकानेर येथे 60 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू, 12 नवीन रुग्ण सापडले.
 • आग्र्यात 25 जणांना कोरोनाची बाधा, रुग्णांची संख्या 45 वर
 • पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 2637 तर 40 जण मृत्युमुखी
 • नमाजासाठी जाणाऱ्या जमावाला रोखल्याने तणाव
 • पाकिस्तानात कराचीमध्ये लॉकडाऊन काळात पोलिसांवर दगडफेक
 • कर्नाटकमध्ये कोरोनाचा आणखी एक बळी, राज्यातल्या मृतांचा आकडा चार वर
 • गोमेकॉला मिळालेल्या 25 नमून्यांपैकी एकाचे नमूने पॉझिटीव्ह आल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या सात झाली
 • विदेशातून जाऊन आलेल्या सांतइस्तेव्ह येथील एकाचे नमूने पॉझिटिव्ह,
 • गोवा  ब्रेकिंग: कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला, सातवा रुग्ण पॉझिटिव्ह सापडला
 • देशातही कोरोग्रस्तांची संख्या अडीच हजारांच्या वर गेली आहे.
 • जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाने देशातही दहशत माजवली आहे.
आपली प्रतिक्रिया द्या