#corona महाराष्ट्रात कोरोनाचा दुसरा बळी, 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू

1602

जागतिक महामारी कोरोना व्हायरसने आता देशासह महाराष्ट्रातही विळखा घालायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईत एका कोरोनाग्रस्त व्यक्तिचा मृत्यू झाला होता. आता अजून एका 63 वर्षीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या मृत्युमुळे महाराष्ट्रातील बळींची संख्या दोन झाली आहे.

या 63 वर्षीय कोरोनाग्रस्त रुग्णाला 21 मार्च रोजी एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, या व्यक्तिचा मृत्यू झाला. या रुग्णाला मधुमेह, अतिउच्चरक्तदाब आणि हृदयविकाराचा त्रास असल्याची माहिती जनआरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान कोरोनाचे 10 नवीन रुग्ण सापडल्याचंही वृत्त असून त्यातील सहा जण मुंबई तर उर्वरित चार जण पुण्याचे आहेत. त्यामुळे मुंबईतील कोरोनाग्रस्तांची संख्या 74 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या