कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाईंचे 1 मार्चपर्यंतचे कार्यक्रम रद्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यात गेल्या काही दिवसात वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता दुसऱ्या लाटेची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे 22 फेब्रुवारी पासून राज्यात सामाजिक, धार्मिक कार्यक्रम, मिरवणूक, मोर्चे, यात्रांवर शासनाने बंदी घालण्यात आली आहे.

त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे 1 मार्चपर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम, बैठका रद्द केल्या आहेत. गृहविभागाच्या अत्यंत तातडीच्या व महत्त्वाच्या बैठका गरजेनुसार घेणार असल्याची माहिती जनसंपर्क कक्षातून प्रसिध्दीस देण्यात आली आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी ‘होय मीच जबाबदार’ मोहिम राबवून मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे, सॅनिटायझरने हातू धुणे हे त्रिसुत्री कार्यक्रम राबवून लॉकडाऊन टाळणेचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले आहे.

त्याचे पालन राज्यातील जनतेने काटेकोरपणे करावे. शासनाच्या नियमांचे पालन करून कोरोना टाळावा अशी विनंतीही गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली आहे.