बुलढाण्यात 24 जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह

585

बुलढाणामधून प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या अहवालांपैकी 24 अहवाल गुरुवारी मिळाले असून सर्व 24 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 820 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. तसेच बुधवारी रात्री तीन पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांसह जिल्ह्यात एकूण 35 कोरोनाबाधित रूग्ण आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे.

आतापर्यंत 24 कोरोनाबाधित रुग्णांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. अशाप्रकारे घरी पाठवण्यात आलेल्या रूग्णांची संख्या 24 आहे. सध्या रूग्णालयात 08 कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार सुरू आहेत. गुरुवारी 24 अहवाल मिळाले आहेत. तसेच 94 नमुन्यांच्या अहवालांची प्रतीक्षा आहे. आतापर्यंत एकूण 820 अहवाल निगेटिव्ह आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. आर. जी. पुरी यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या