मुंबईत सलग दुसऱया दिवशी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढतीच, 793 कोरोनामुक्त

मुंबईत शुक्रवारी सलग दुसऱया दिवशी कोरोनामुक्त रुग्णांची संख्या चढीच राहिली. दिवसभरात 793 जण कोरोनामुक्त झाले तर दिवसभरात 574 कोरोना रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, मुंबईत रुग्ण दुपटीचा कालावधी वाढून 382 दिवसांवर पोहोचला आहे.

मुंबईतील विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आणि दीर्घकालीन आजार असणाऱया 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या 11 हजार 227 वर पोहोचली आहे. मुंबईत कोरोनामुक्त होणाऱयांची एकूण संख्या 2 लाख 82 हजार 435 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 93 टक्क्यांवर आले आहे तर रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 382 दिवसांवर  पोहोचला आहे. मुंबईत सक्रीय रुग्णांची संख्या 7 हजार 104  वर पोहोचली आहे. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 25 लाख 65 हजार 443  चाचण्या झाल्या असून रुग्णांची संख्या 3 लाख 1 हजार 652  वर पोहोचली आहे.

राज्यात दिवसभरात 3,500 जण कोरोनामुक्त

कोरोनाविरोधात महाराष्ट्रभरात राबकण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेला चांगले यश आले असून राज्यात शुक्रवारी दिवसभरात 3 हजार 500 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून रिकव्हरी रेट 94.78 टक्क्यांवर पोहोचला आहे तर 3 हजार 145 कोरोना रुग्णांची नोंद झाली.

कोरोना पार्श्वभूमीवर, राज्यभरात सरकार आणि नगरपालिका, महानगरपालिकेकडून कोरोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. शुक्रवारी दिवसभरात कोरोनामुळे 45 जणांचा मृत्यू झाला तर मृत्यूदर 2.54 कर आला आहे. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या 1 कोटी 36 लाख 84 हजार 589 चाचण्या झाल्या असून 19 लाख 84 हजार 768 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. राज्यात सध्या 2 लाख 24 हजार 851  जण होम क्वारंटाइन असून 2 हजार 204 जण संस्थात्मक क्वारंटाइन आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या