चंद्रपूरात कोरोनामुळे पहिला मृत्यू; कोरोनाबाधितांची संख्या 536 वर

598

चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनामुळे शनिवारी पहिला मृत्यू झाला आहे. रेहमतनगर परिसरातील रहिवासी असलेल्या 42 वर्षांच्या रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तो दोन दिवसांपूर्वीच अमरावतीहून परतल्यानंतर तपासणीत कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता. त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. त्याला श्वास घ्यायला त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

खबरदारीचा उपाय म्हणून तो राहत असलेला परिसर करणार सील करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या नातेवाईकांचे स्वॅब घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 536 वर पोहचली असून त्यापैकी 338 रुग्ण बरे झाले आहेत. तर 198 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या