कवठे येमाईत कोरोनाचा शिरकाव; अण्णापूरध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

409

कवठे येमाईतील शिरूर- मंचर रोडवर असलेल्या अण्णापूर येथील स्थानिक पुरुषाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला असून या रुग्णाने शिरूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेतल्याची माहिती शिरूर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली. याआधी शिरूर तालुक्यात मुंबईतून आलेल्या नागरिकांपैकीच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे उघड झाले होते. आता अण्णापूर येथील स्थानिक नागरिकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने अण्णापूरसह शिरूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

अण्णापूर येथे राहणाऱ्या पुरुषाला त्रास होत असल्याने त्यास शिरूरच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तेथे उपचार करण्यात आले. तेथे जवळच असणाऱ्या एका लॅबमध्ये त्याने एक एक्स-रे काढल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीचा संशय आल्याने त्याची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्याचा अहवाल शुक्रवारी आला असून त्यात हा पुरुष कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. गावातील नागरिकांनी घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घ्यावी. शासनाने दिलेल्या सर्व अत्यावश्यक नियमांचे पालन करा, असे आवाहन या वेळी डॉ शिंदे यांनी केले. तर अण्णापूरमध्ये ज्या भागात हा रुग्ण राहतो तेथे काहीजण मुंबई येथून आले असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या