चेकपोस्ट चुकवून 3 जण तालुक्यात, एक जण परभणीला उपचारासाठी दाखल

746

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आलेल्या असतांनाही मंगळवारी 7 मार्च रोजी पुणे येथून 3 जण पाथरी तालुक्यातील ढालेगाव येथील चेक पोस्ट चुकवून सेलू तालुक्यातील कवडधन येथे दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे या तिघांनाही ढालेगाव चेक पोस्ट वरून परत पाठवलेले असतांनाही तालुक्यातील गुंज मार्गे हे चेक पोस्ट चुकवून सेलू तालुक्यात दाखल झाले. त्यामुळे चोरून लोक सेलू तालुक्यात दाखल होत आहेत हे समोर आले आहे. याच्या चौकशीचे आदेश तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी दिले आहेत.

या तिघांपैकी एकाने सेलू येथील खासगी रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर त्याला परभणी येथील जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर इतर दोघांना कवडधन गावातच क्वारंटाईन करण्यात आले आहे. दरम्यान सेलू तालुक्यात अजून कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह नाही ही चांगली बाब आहे. परंतु जिल्ह्याच्या सीमा बंद केलेल्या असतानाही अशा प्रकारे लोक सेलू तालुक्यात चोरून प्रवेश करीत असल्याने धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.पोलिसांचा कडक बंदोबस्त असतांना चोरट्या मार्गाने देखील लोक कसे येऊ शकतात? असाही प्रश्न निर्माण होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या