कोरोनाची दहशत – 2000 टॅक्सी-रिक्षा चालक यूपी-बिहारच्या दिशेने निघाले

2087

कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईसह देशभरात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे टॅक्सी-रिक्षा व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळेच टॅक्सी-रिक्षा चालक पुन्हा घराकडे निघाले आहेत. मुंबई टॅक्सी मेन यूनियन लीडर एएल कुड्रोस यांनी रविवार दावा केला की यूपी, बिहार मधील 2000 टॅक्सी आणि ऑटो चालक आपल्या कुटुंबीयांना घेऊन मुंबईहून आपापल्या राज्याकडे निघाले आहेत. ते म्हणाले की गेल्या महिन्यापासून वाहन चालकांचे उत्पन्न पूर्ण बंद आहे. अशा परिस्थितीत शहरात राहणे अत्यंत कठीण आहे. मुंबईसह देशात कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे लॉकडाऊन वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात उत्पन्नाचे साधन नाही, त्यामुळे ते घरी परतत असून आपापल्या वाहनाने ते गावी परतू इच्छित आहेत.

मुंबई टॅक्सी मेन यूनियन लीडर एएल कुड्रोसने रविवार ही घोषणा करताना राज्य परिवहन विभागाकडे काळी पिवळी टॅक्सी चालकांना अन्य राज्यांचे परमिट द्यावे अशी मागणी केली आहे. त्यामुळे सर्व चालक आपल्या राज्यात सुखरूप पोहोचू शकतील, असा त्यांना विश्वास आहे.

ते म्हणाले की यूपी, बिहार, झारखंड आणि हिमाचलमधील वाहन चालक आपल्या घरांच्या दिशेने रवाना होत आहेत. मुंबई शहरात 20,000 काली-पिवळी टॅक्सी आणि दोन लाखाहून अधिक ऑटो रिक्षा आहेत. हे वाहन चालक आपापल्या राज्यात परतत आहेत, त्यामुळे लॉकडाउन हटल्यानंतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर त्याचा मोठा परिणाम दिसून येईल, असेही ते म्हणाले. नवभारत टाईम्सने हे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या