
देशात कोरोना विषाणुची दुसरी लाट कायम आहे. रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी संसर्ग अजून पूर्णपणे संपलेला नाही. मंगळवारी 18,47,518 सँपलची तपासणी करण्यात आली. मंगळवारपर्यंत एकूण 47,31,42,307 सँपलची तपासणी करण्यात आली आहे. ही माहिती भारतीय वैद्यकीय संसोधन परिषद (ICMR) ने दिली आहे.
भारत में कल कोरोना वायरस के लिए 18,47,518 सैंपल टेस्ट किए गए, कल तक कुल 47,31,42,307 सैंपल टेस्ट किए जा चुके हैं: भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषद (ICMR) #COVID19 pic.twitter.com/PoasUWnxjm
— ANI_HindiNews (@AHindinews) August 4, 2021
8 राज्यांमध्ये ‘आर’ फॅक्टरची डोकेदुखी कायम आहे. केवळ महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्यांमध्ये याची चिंता कमी झाली आहे. देशातील एकूण 44 जिह्यांचा कोरोना पॉझिटीव्हीटी रेट 10 टक्क्यांपेक्षा अधिक असून 57 जिह्यांमध्ये दररोज 100 नवीन रुग्ण आढळत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी मंगळवारी ही माहिती दिली. त्यांनी याबाबत राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला.
आर फॅक्टरचा (रिप्रोडक्शन नंबर) उपयोग करून कोरोना रुग्णवाढ व सक्रीय रुग्णसंख्येचा अंदाज बांधला जातो. एका संक्रमित व्यक्तीपासून इतर किती लोकांना संसर्ग झाला, याची सरासरी संख्या या फॅक्टरवरून कळते. 8 राज्यांत ही सरासरी वाढल्याने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव अग्रवाल यांनी चिंता व्यक्त केली. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थानात सरासरी 1.2 आर नंबर आहे. याचा अर्थ एका संक्रमित व्यक्तीपासून एकापेक्षा अधिक लोक बाधित होत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्याची गरज आहे, असे अग्रवाल यांनी नमूद केले. तिसऱया लाटेबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी सर्वात आधी आपल्याला दुसरी लाट आटोक्यात आणायची असल्याचे ते म्हणाले. मर्यादित क्षेत्रांमध्येच रुग्णवाढ होत आहे. निर्बंध शिथिल केल्यानंतर जर कोरोना नियमावलीचे पालन झाले नाही तर रुग्णसंख्या वाढू शकते, असाही सावधगिरीचा इशारा त्यांनी दिला.



























































