लसकर-ए-कोरोना, राज्यासह अवघ्या देशभरात लसीकरणाला सुरुवात

कोरोनाला हरवायचेच या निर्धाराने रणांगणात उतरलेल्या कोविड योद्धय़ांना अखेर सुरक्षा कवच मिळाले आहे. राज्यासह देशभरात कोरोना लसीकरणाला आजपासून सुरुवात झाली. लसीकरणाचा पहिलाच दिवस यशस्वी ठरला.

देशभरात 1 लाख 91 हजार 181 जणांना तर राज्यात 18 हजार 338 हून अधिक आरोग्य कर्मचाऱयांना लस देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत बीकेसी येथील कोविड केंद्रात राज्यातील लसीकरण मोहिमेचा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय स्तरावरील लसीकरणाचा शुभारंभ झाला.

कोरोनाविरुद्ध आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. आरोग्य कर्मचारी आता नव्या जोमाने युद्धात उतरतील आणि ‘लसकर-ए-कोरोना’ला पराभूत करतील हे नक्की! अवघ्या देशभरात आज उत्साहाचे आणि जणू उत्सवाचेच वातावरण होते. अनेक कोविड केंद्रांबाहेर रांगोळय़ा काढल्या होत्या, स्वागताचे फलकही झळकत होते.

राज्यात सकाळी 11 पासून लसीकरणाला सुरुवात झाली. बहुतांश जिल्ह्यांमध्ये पालकमंत्री, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाला प्रारंभ झाला. सायंकाळी 7 पर्यंत लसीकरण सुरू होते. दिवसभरात कुठेही लसीमुळे गंभीर दुष्परिणाम झाल्याची नोंद नसल्याचे आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

वांद्रे कोविड सेंटर

वांद्रे कोविड सेंटर येथील लसीकरण शुभारंभाच्या कार्यक्रमाला आमदार झिशान सिद्दीकी, उपमहापौर ऍड. सुहास वाडकर, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, सुधार समिती अध्यक्ष सदानंद परब, शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, ‘बेस्ट’ समिती अध्यक्ष प्रवीण शिंदे, आरोग्य समिती अध्यक्षा प्रविणा मोरजकर, विधी समिती अध्यक्ष हर्षद कारकर, अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी आदी उपस्थित होते.

एकालाही साइड इफेक्ट नाही

मुंबईत आज लसीकरणाच्या पहिल्या दिकशी सायंकाळी 5 काजेपर्यंत लसीकरण करण्यात आले असून 1 हजार 926 जणांना लस देण्यात आली. पालिकेच्या 9 आणि राज्य सरकारच्या एका केंद्राकर हे लसीकरण करण्यात आले. लसीकरण केलेल्या कुणाकरही लसीचा साइड इफेक्ट झाला नसल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

राज्यातील कोरोना लसीकरणाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पालिकेच्या वांद्रे बीकेसी कोविड सेंटरमध्ये करण्यात आली. यावेळी पहिली लस सिंधुदुर्ग कन्या असलेल्या डॉ. मधुरा अवसरे-पाटील यांना देण्यात आली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल, महापौर किशोरी पेडणेकर आदी यावेळी उपस्थित होते.

असे झाले लसीकरण

243 – केईएम

188 – शीव

190 – नायर

262 – कूपर

149  – वांद्रे, भाभा

80 – व्ही.एन.देसाई

289 – राजावाडी

266 -डॉ. आंबेडकर

220 – बीकेसी

39- जे.जे.

आपली प्रतिक्रिया द्या