
कोरोना विषाणूंविरूद्ध लस देण्यासाठी 12 देशांनी हिंदुस्थानची मदत मागितली आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. विनोद के पॉल यांनी शनिवारी कोरोना विषाणू संदर्भात झालेल्या मंत्र्यांचा उच्चस्तरीय गट (जीओएम) बैठकीत ही माहिती दिली.
पॉल यांनी जीओएमला लसीकरणाच्या तीन महत्वाच्या बाबींबद्दल (लसीची चाचणी, लस उत्पादक आणि लसीची उपलब्धता) सविस्तर सादरीकरण दिले. सध्या देशात एक कोटीहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत.
याच बैठकीत उपस्थित केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी लक्ष्य असलेल्या 30 कोटी लोकांना लवकरात-लवकर लस देण्यात यावी यावर भर दिला. जीओएमच्या 22 व्या बैठकीचे अध्यक्ष हर्षवर्धन होते. त्यांनी व्हिडिओ-कॉन्फरन्सद्वारे बैठकीला संबोधित केले.


























































