15 ऑगस्टला कोरोनापासून स्वातंत्र्य! ‘कोवॅक्सीन’ लस उपलब्ध होणार

3463

येत्या 15 ऑगस्टला हिंदुस्थानला कोरोनापासून स्वातंत्र्य मिळण्याची शक्यता आहे. संपूर्ण स्वदेशी बनावटीची ‘कोवॅक्सीन’ ही कोरोना प्रतिबंधक लस 15 ऑगस्टला बाजारात उपलब्ध होऊ शकणार आहे. भारत बायोटेक या कंपनीने इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरोलॉजी (एनआयव्ही) यांच्या सहकार्याने ही लस तयार केली आहे.

कोवॅक्सीन लसीला काही दिवसांपूर्वीच आयसीएमआरने मानवी चाचणीसाठी परवानगी दिली होती. आयसीएमआरने आज एक पत्रक जारी केले. त्यानुसार या लसीच्या मानवी चाचणीसाठी 7 जुलैपासून नोंदणी सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर सर्व चाचण्या पूर्ण होऊन अहवाल चांगले आले तर 15 ऑगस्टपासून ही लस कोरोनाबाधितांसाठी वापरण्यास सुरुवात करण्यात येईल.

– प्रत्येक टप्प्यातील मानवी चाचण्या यशस्वी झाल्यास भारत बायोटेकने बनवलेली ही लस देशातील पहिली कोरोना प्रतिबंधक लस ठरणार आहे.
– 15 ऑगस्ट ही डेडलाइन दिली असली तरी ती केवळ शक्यता असल्याचेही आयसीएमआरच्या अधिकाऱयांनी सांगितले.
– ड्रग कंट्रोलर ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन आणि केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पहिल्या व दुसऱया टप्प्यातील मानवी चाचण्यांसाठी भारत बायोटेकला परवानगी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या