कोरोनाची लस येणार पुढच्या वर्षी, केंद्र सरकारचा नवा मुहूर्त

देशातील जनतेसाठी पुढील वर्षाच्या सुरुवातीला कोरोनावरील लस उपलब्ध होऊ शकेल, असे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली तज्ज्ञांचा एक समूह लसीच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे. आम्ही याचे आगाऊ नियोजन केले आहे, असे ते म्हणाले.

अमित शहा ठणठणीत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आज दिल्लीतील एम्स रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनामुक्त झाल्यानंतर वैद्यकीय चाचणीसाठी ते काही दिवसांपूर्वी एम्स रुग्णालयात दाखल झाले होते. अमित शहा यांना 2 ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर कोरोनातून पूर्णपणे बरे झाल्यानंतर 14 ऑगस्टला त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले.  12 सप्टेंबर रोजी त्यांना पुन्हा एकदा श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने वैद्यकीय चाचणीसाठी त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या