रशियामध्ये कैद्यांवर होऊ शकते कोरोना औषधाची चाचणी, बक्षीसही मिळणार

1276

रशियामध्येही कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत देशात साडे तीन लाखहून अधिक रुग्ण आढळले असून साडे तीन हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रशियामध्येही कोरोनावर लस शोधण्याचे काम सुरू आहे. या औषधाची चाचणी तुरुंगातील कैद्यांवर करावा असे मत एका मोठ्या नेत्याने व्यक्त केले आहे.

रशियाचे नेते शामिल व्लादिमीर झिरिनोवस्की म्हणाले की कोरोनाच्या लस लवकरात लवकर शोधणे गरजेचे आहे. त्यासाठी या औषधाची चाचणी कैद्यांवर झाली पाहिजे. जे कैदी गंभीर आरोपांखाली तुरुंगात कैद आहेत, त्यांच्यावर हे प्रयोग करून त्याबदल्यात या कैद्यांची शिक्षा कमी झाली पाहिजे असे झिरिनोवस्की म्हणाले.

शिक्षा अर्धी होईल या ऑफरवर हजारो कैदी स्वखुशीने पुढे येतील असा विश्वास झिरिनोवस्की यांनी व्यक्त केला आहे. झिरिनोवस्की हे लिबरल डेमोक्रेटिक पक्शाचे नेते असून त्यांचा पक्ष संसदेतील तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष आहे. परंतु अनेकांनी झिरिनोवस्की यांच्या मताला विरोधा केला आहे. त्यामुळे मानवाधिकारांवर गदा येईल असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या