राज्यात दीड लाख कोरोनाचे रुग्ण बरे

164

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱया रुग्णांचे प्रमाणही 55.37 टक्क्यांवर पोहोचले आहे. दीड लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले असून त्यांची एकूण संख्या 52 हजार 613 झाली आहे. आज 3606 रुग्णांना घरी सोडण्यात आले. दिवसभरात कोरोनाचे 7975 नवीन रुग्ण आढळले असून असून सध्या राज्यात 1 लाख 11 हजार 801 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

मुंबईत 1,390 नवे रुग्ण, 62 जणांचा मृत्यू

मुंबईत एका दिवसात कोरोनाचे 1,390 नवे रुग्ण सापडले असून गेल्या 48 तासांत 62 जणांचा मृत्यू झाला आहे तर गेल्या 24 तासांत 1,197 जण कोरोनामुक्त झाले असून मुंबईत एकूण कोरोनामुक्त होणाऱयांची संख्या आता 67 हजार 830 वर पोहोचली आहे. मुंबईत 62 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण मृतांची संख्या आता 5 हजार 464 झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या