कोपरगावात कोरोनाग्रस्तांची संख्या ८; आणखी दोघांना लागण

972

कोपरगावात कोरोनाग्रस्तांची संख्या 8 झाली आहे. शुक्रवारी ७० ते ७५ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली मात्र त्यातील ५५ ते ६० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आज कोरोनाग्रस्तांची संख्या १४ झाली असून ६ जण कोरोनामुक्त झाल्याने आज केवळ आठ जण उपचार घेत आहे तर २१ जणांचे स्वॅब तपासणी साठी जिल्हा रुग्णालयाकडे पाठविण्यात आले आहेत.

कोपरगाव येथील कोविड रुग्णालयात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेण्यात आलेल्या २० रुग्णांपैकी १८ रुग्णांचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. राहिलेल्या दोन जणांचे कोरोना तपासणी अहवाल “पॉझिटिव्ह’ आल्याने कोपरगाव शहरात कोरोना लागण झालेल्या रुग्णांची संख्या आठ इतकी झाली आहे. शनिवारी आणखी २१ जनांचे स्वॅब तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संतोष विधाटे यांनी दिली

अधिक माहिती देताना ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कृष्णा फुलसौंदर म्हणाले, आज प्रात झालेल्या अहवालात कोरोनाग्रस्त डॉक्टर यांच्या दवाखान्यातील नर्स व मुंबईवरून आलेल्या जावयाचा मुलगा हे दोघेही कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत त्याचबरोबर डॉक्टर कुटुंबीयांच्या व जावयाच्या संपर्कात आलेल्या आणखी २१ जणांचे स्वॅब शनिवारी जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

कोरोना ग्रस्त आठ जणांमध्ये डॉक्टर कुटुंबियातील पाच व नर्स या सहा जणांचा तर मुंबईवरून आलेला जावई व त्याचा मुलगा या दोघांचा समावेश आहे. कोरोनाग्रस्त मध्ये चार महिला व चार पुरुष यांचा समावेश आहे . यामुळे उपचार घेत असलेल्या तालुक्यातील कोरोना बधितांची संख्या ८ झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या