कोरोनाने सर्व रेकॉर्ड तोडले, गेल्या 24 तासातील आकडेवारी भीतीदायक

देशात गेल्या 24 तासातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. ही वाढ तब्बल आता अडीच लाखाच्या जवळ पोहोचली आहे. गेल्या 24 तासात देशात 2,34,692 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत तर तब्बल 1341 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. तर 1,23,354 कोरोनाग्रस्त हे बरे झाले आहेत.

गेल्या 24 तासात देशातील सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळून आले. महाराष्ट्रात 63,729 कोरोनाग्रस्त आढळून आले तर 398 जणांचा मृत्यू झाला. त्याखालोखाल उत्तर प्रदेशात 27,360, दिल्लीत 19,486, छत्तीसगढमध्ये 14912, कर्नाटकात 14859 कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. देशातील तब्बल 59.79 टक्के रुग्ण हे या पाच राज्यात आहेत.

देशात आतापर्यंत 1,45,26,609 जणांना कोरोनाची लागण झालेली आहे. तर 1,26,71,220 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर 16,79,74 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. एकूण मृतांचा आकडा हा 1,75,649 वर पोहोचला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या