#Coronavirus – हुबेईमध्ये एकाच दिवसात 242 जणांचा मृत्यू

868
प्रातिनिधीक फोटो

चीनमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातले असून या व्हायरसमुळे आतापर्यंत हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका बसलेल्या वुहानमधील हुबेई प्रांतात एकाच दिवसात 242 जणांचा मृत्यू झाला आहे. याआधी हुबेई मध्ये 10 फेब्रुवारीला 103 नागरिकांचा मृत्यू झाला होता.

या व्हायरसमुळे चीनमध्ये दररोज हजारो नागरिक आजारी पडत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) आरोग्य आणिबाणी जाहीर केली आहे. बुधवारी तब्बल 2250 नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. आतापर्यंत हा आकडा 15 हजाराच्या पार गेला आहे.

दरम्यान चीनमध्ये 14 हजार कोरोनाग्रस्तांना चीन प्रशासनाने जाळल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. चीन सरकार मरणाऱ्यांची संख्या कमी दिसावी यासाठी हे करत असल्याचं बोललं जात आहे. कारण, अवकाशातील उपग्रहांनी कोरोनाचे मूळ ठिकाण असलेल्या वुहान प्रांताची काही छायाचित्रं घेतली आहेत. त्या छायाचित्रात लाल पिवळ्या रंगाचा आगीच्या लोळासारखा प्रकाश दिसत असून हा प्रकाश सल्फर डायऑक्साईडचा आहे. त्यामुळे जगभरातील शास्त्रज्ञांच्या संशयाची सुई चीनवर रोखली गेली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या