सव्वालाखाच्या पार पोहोचला कोरोनाग्रस्तांचा आकडा, सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ

देशातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात देशात 6654 रुग्ण आढळले असून 137 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1,25,101 वर पोहोचला आहे. यात 69597 अॅक्टिव्ह केसेस असून 3720 जणांचा मृत्यू झाला.

शुक्रवारी देखील देशात 6088 रुग्ण आढळले होते. शनिवारी सलग दुसऱ्या दिवशी सहा हजाराच्या पुढे रुग्ण आढळले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या