लॉकडाऊनने काय साधले? विरोधकांचा हल्लाबोल

649

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पंतप्रधानांनी देशात लॉकडाऊन केला, मात्र त्याने काय साध्य झाले. उलट कोणतेही नियोजन न करता लॉकडाऊन केल्याने देशाची अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागली आणि देश देशोधडीला गेल्याची जळजळीत टीका विरोधी पक्षांनी आज राज्यसभेत केली.

कोरोनावरील चर्चेत सहभागी होताना काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी मोदी सरकारची लक्तरे काढली. इतर देशांच्या तुलनेत िंहदुस्थानात सरकारने कोरोनाची स्थिती खूप चांगली हाताळल्याचे सरकार म्हणते. मात्र वस्तुस्थिती खरीच तशी आहे काय, असा सवाल करत त्यांनी पाकिस्तान, श्रीलंका आणि इतर देशांतही कोरोनाची स्थिती आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीने हाताळली गेल्याचे सोदाहरण स्पष्ट केले. लॉकडाऊनमध्ये किती स्थलांतरितांचा मृत्यू झाला याचीही आकडेवारी सरकारकडे नाही. हे आकडे सरकारने का मिळवले नाहीत, असा सवाल करत राज्य सरकारकडे सगळी माहिती असेल. अशा प्रत्येक राज्यांकडून आकडेवारी मिळवली असती तरी हे आकडे मिळवता आले असते, मात्र सरकारला याबाबतीतही लपवालपवी करायची आहे, असा आरोप शर्मा यांनी केला.

केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी मोदी सरकारच्या कामगिरीमुळे 14 ते 29 लाख लोकांना कोरोनापासून वाचविण्यात तसेच 37 हजार ते 78 हजार नागरिकांना वाचविण्यात सरकारच्या प्रयत्नामुळे यश आल्याचे नमूद केले आहे. हे आकडे आले कुठून त्यामागचा तर्क आहे, असा टोलाही शर्मा यांनी लगावला. लॉकडाऊनचा किती फायदा झाला िंकवा किती नुकसान झाले हे देशाला समजले पाहिजे. संसदेचे ते कर्तव्य आहे. सरकारने ते स्पष्टपणे सांगावे, असेही आनंद शर्मा यांनी सुनावले.

आपली प्रतिक्रिया द्या