#corona बिहारमध्ये कोरोनाग्रस्ताचा मृत्यू, हिंदुस्थानात बळींची संख्या सहावर

541
प्रातिनिधीक फोटो

बिहारची राजधानी पाटणा येथे एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या मृत्युमुळे हिंदुस्थानातील बळींची संख्या सहा झाली आहे. पाटणा येथील एम्स रुग्णालयात या व्यक्तिवर उपचार सुरू होते.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाटण्यातील हा 38 वर्षीय रुग्ण काही दिवसांपूर्वीच कतारवरून हिंदुस्थानात आला होता. त्याला प्रकृतीच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, रविवारी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याची चाचणी केली गेली. त्यात हा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं उघड झालं. हा रुग्ण मुंगेर इथला रहिवासी आहे. दोन दिवसांपूर्वी तो कोलकात्याहून आला होता. मात्र, त्याला किडनीचा त्रास झाल्याने तो एम्समध्ये दाखल झाला होता.

बिहारमध्ये आतापर्यंत दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या रुग्णावर बिहार येथील नालंदा मेडिकल कॉलेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत. देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 348 झाली आहे. यातील 29 जणांवर उपचार पूर्ण झाले आहेत, तर 6 जणांचा मृ्त्यू झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या